नगरपंचायत कार्यक्षेत्रात 2 कोटी 5 लाखांच्या 17 विकासकामांचे आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत भुमीपूजन.

 

दोन वर्षापासून रखडलेली विकासकामे मार्गी लागत असल्याने नागरीकांमधून समाधान

मंडणगड | प्रतिनिधी : मंडणगड शहराचे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध प्रभागात नाविन्यपुर्ण योजनेच्या अंर्तगत 2 कोटी 5 लाखांच्या निधीच्या विनीयोगाच्या सतरा विकासकामांचे भूमीपूजने 8 मे 2023 रोजी आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या निमीत्ताने शहर विकास आघाडी व नगरपंचायत विरोधी पक्षाचेवतीने मोठी वातावरण निर्मीती करण्यात आली होती. विकासकामांचे भुमीपूजन नारळ त्या त्या प्रभागातील जेष्ठ व मान्यवरांच्या हस्ते वाढविण्यात आले.

यात आदर्शनगर बोरीचा माळ परकर गुरुजी यांच्या घराजवळ भूमीपनज, सापटेवाडी उदय गोसावी यांच्या घराजवळ भूमीपूजन, दुर्गवाडी भैरी मंदिर भेकत वाडी भुमीपजून व जाहीर सभा, प्रमोद काटकर यांच्या घराशेजारी भुमीपूजन साईनगर पटांगण येथे भूमीपजून, धनगर वाडी येथे भूमीपूजन कुंभारवाडी वाघजाई मंदिर येथे भुमीपजून, तुरेवाडी येथे भूमीपजून, कृष्णा नगर येथे भुमीपजून त्याचबरोबर परिवार पार्क मंडणगड येथेही भूमीपूजन करण्यात आले. या कार्यक्रमास माजी सभापती आदेश केणे, अनंत लाखण शिवसेना तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, बांधकाम सभापती सौ.प्रियांका लेंडे, नगरसेवक तथा शहरप्रमुख विनोद जाधव, आदेश मर्चंडे, सुभाष सापटे, प्रमिला किंजळे, वैशाली रेगे, योगेश जाधव, सेजल गोवळे, मुश्ताक दाभिळकर, माजी बांधकाम सभापती दिनेश लेंडे, निलेश गोवळे, नरेश बैकर, नम्रता पिंपळे, प्रविण जाधव, नागेश घोसाळकर, श्रृती पोस्टुरे, प्रमोद काटकर, चेतन सातोपे, प्रतीक पोतनीस यांच्यासह शहरातील नागरीकांची ठिकठाणच्या कार्यक्रमात उपस्थिती लाभली. भुमीपूजन कार्यक्रमात शहरातील दुर्गवाडी येथील भैरीमंदिरात आयोजीत जाहीर कार्यक्रमात येथील नागरीकांना संबोधीत करताना मंडणगड शहराच्या विकासाकरिता आपण कटीबध्द असल्याचे आमदार योगेश कदम यांनी सांगीतले. शहराचे विकासाचे प्रश्नावर ते करीत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी यावेळी विस्ताराने माहीती दिली. दापोली खेड शहरांबरोबर मंडणगड शहराचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. पायाभुत सुविधांची निर्मीती व विकासाचे प्रश्नात राजकारण न करता सहकार्याची भूमीका ठेवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान शिवसेनेच्यावतीने आयोजीत या कार्यक्रमासंदर्भातील सत्ताधारी व विरोधकांमधून समर्थन व विरोधाच्या संमिश्र प्रतिक्रीया आल्या असल्या तरी दोन वर्षापासून रखडलेली विकासकामे मार्गी लागत असल्याने नागरीकांमधून मात्र समाधान व्यक्त केले गेले आहे.