कोकण कृषी विद्यापीठातील शिक्षकांनी लिहिलेल्या पुस्तकाचे भारतीय कृषि अनुसंधान संस्थान., नवी दिल्ली येथे विमोचन

Release of book written by teachers of Konkan Agricultural University at Indian Institute of Agricultural Research, New Delhi

दापोली |प्रतिनिधी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथील अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत विभागाचे प्रमुख डॉ अतुल मोहोड, कृषि महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अमित देवगिरीकर आणि एम.आय.टी.औरंगाबाद येथील सहाय्यक प्राध्यापक प्राची खोरगडे यांनी लिहिलेल्या ‘नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानावरील व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ प्रश्न बँक’ या पुस्तकाचे विमोचन भारतीय कृषि अनुसंधान संस्थान, नवी दिल्ली येथे ५ मे रोजी आग्रिविजन च्या ७ व्या अधिवेशनात प्रकाशित झाले. या पुस्तक विमोचानास मा.ना. कैलाश चौधरी-केंद्रीय कृषी राज्यमंत्री, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय डॉ. ए.के. सिंग, कुलगुरू, राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ, झाशी, श्री आशिष चौहान, राष्ट्रीय संघटना मंत्री, ABVP, डॉ. जे. के. जेना, एडीजी, मत्स्यव्यवसाय, शिक्षण, भारतीय कृषि अनुसंधान संस्थान, नवी दिल्ली, श्री शुभम पटेल, राष्ट्रीय मंत्री, ABVP, श्री रघुराज किशोर तिवारी, अध्यक्ष राष्ट्रीय सल्लागार समिती, कृषी विभाग, श्री निशांत, संयोजक, अगरिविजन २०२३, आणि श्रीमती आरती गवारे, सह संयोजक, अग्रीविजन २०२३ हे उपस्थितीत होते. सदर पुस्तक हे बी. एस. सी. (कृषी) च्या चौथ्या सत्रात असलेल्या विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नोत्तराच्या स्वरुपात लिहिले आहे.

डॉ. अमित देवगिरीकर यांचे सहावे पुस्तक असून या आधी बी. एस.सी.(कृषी) च्या विविध इंजिनीअरिंगच्या विषयावर विद्यार्थ्यांना समजेल अश्या सोप्या भाषेत त्यांनी पाच पुस्तक प्रकाशित केली आहेत. ज्याला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता सदर पुस्तक राष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाल्याने ते पूर्ण भारतभर उपलब्ध असणार आहेत. काही विद्यापीठांनी यातील काही पुस्तकं त्यांच्या अभ्यासक्रमात मान्यताप्राप्त करून घेतले आहेत.

अशा संकल्पनेचे पुस्तक लिहिण्याकरीता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, संशोधन संचालक डॉ. संजय भावे, माजी शिक्षण संचालक डॉ. सतिष नारखेडे यांचे मार्गदर्शन लाभले.