नांदगाव हायवेवर अनधिकृत मिडलकटमुळे चारचाकी – दुचाकीमध्ये अपघात

दुचाकीस्वार गंभीर जखमी

कणकवली : नांदगाव ओटव फाटा खालची मुस्लिमवाडी स्नेहल निवास समोरील मिडलकटमुळे मंगळवारी सायंकाळी ३:३० च्या सुमारास दुचाकी व नेक्झो कार यांच्यात अपघात झाला. गोव्याहून पुणे एमएच १२ टीएस ७६०८ टाटा नेक्झोन ची धडक बसून हा अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

हा अपघात निव्वळ मिडलकट चालू असल्यामुळे झालेला असून संबंधित यंत्रणा व हायवे प्राधिकरण किती अपघातांची वाट बघणार आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
९ नोव्हेंबर २२०३ रोजी नांदगाव ओव्हर ब्रिजखाली हायवेच्या प्रलंबित कामांबाबत पूर्तता न झाल्यामुळे आमरण उपोषण करण्यात आलं होतं आणि त्यावेळी केसीसी कंपनी तसेच हायवे प्राधिकरणचे अधिकारी यांनी पुन्हा एकदा आश्वासन देऊन उपोषण स्थगित केले होते. दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात होईल असे आश्वासन दिले होते. परंतु तसे काहीही होताना दिसत नाही. त्याचा प्रत्यय मंगळवारी पुन्हा एकदा नांदगाव खालची मुस्लिमवाडी येथील स्नेहल निवास समोर दिसला. याठिकाणी एक अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. या झालेल्या अपघाताला आहे सर्वस्वी जबाबदार हायवे प्राधिकरण आणि केसीसी कंपनी आहे अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हे असेच चालू राहिले तर नाईलाज असतो कायदा हातात घ्यावा लागेल अशी ग्रामस्थांमधून चर्चा सुरू होती.

अपघातांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने अनिकेत तर्फे यांनी सष्टेंबर महिन्यात खारेपाटण ते कणकवली पर्यंत असलेले सर्व अनधिकृत मिडलं कट बंद करावेत अशी मागणी केली होती. २० नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली असून २० नोव्हेंबर पर्यंत मिडल कट बंद न केल्यास २१ रोजी मनसे तर्फे तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अनिकेत तर्फे यांनी दिला आहे.

यावेळी घटनास्थळी कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव, हवालदार श्री. देसाई, चंद्रकांत माने, मकरंद माने यांच्यासह नांदगाव सरपंच श्री. मोरजकर आदींनी धाव घेतली होती.