सिंधुदुर्ग पोलीस दलातील महिला चालकास कोल्हापूर पोलिसांकडून अटक

सिंधुनगरी | प्रतिनिधी

सिंधुदुर्ग पोलीस दलातील मोटर ट्रान्सपोर्ट विभागातील पोलीस चालक कर्मचारी श्रीमती तृप्ती मुळीक हिला अखेर एका फसवणूक प्रकरणात गुरुवारी कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. महिनाभरापूर्वी कोल्हापूर राजारामपुरी पोलीस ठाण्यात नऊ जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यात हिचा सहभाग असल्याची फिर्याद होती व त्यानुसार तिच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. उच्च न्यायालयाने तिचा अटकपूर्वअर्ज जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अटकेची कारवाई झाली आहे.

तृप्ती मुळीक या सिंधुदुर्ग पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून सन 2011 बॅचमध्ये रुजू झाल्या होत्या. त्यानंतर त्याने चालक पदाचे प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस चालक म्हणून जिल्हा पोलीस दलाच्या मोटर ट्रान्सपोर्ट विभागात आपले बदली करून घेतली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व तत्कालीन उद्योग मंत्री किरण सामंत यांच्या शासकीय वाहनाचे सारथ्य केले होते. त्यामुळे नाव सांगितले तृप्ती मुळीक या प्रकाशझोतात आल्या होत्या. जादूटोणा, करनी व त्यानंतर आर्थिक व सोने चांदी दागिने व इतर कोणती वस्तू घेऊन फसवणूक केलेल्या या रॅकेटमध्ये तृप्ती मुळीक यांचा समावेश असल्याची ही तक्रार कोल्हापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली. महिनाभरापूर्वी ही तक्रार दाखल झाली असून त्याची पोलीस चौकशी सुरू होती.

दरम्यान तृप्ती मुळीक सध्या जिल्हा पोलीस दलाच्या मोटर विभागात कार्यरत होती. याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा न्यायालयात जमण्यासाठी अर्ज केला होता. तो त्या न्यायालयाने फेटाळल्यानंतर तिने उच्च न्यायालयात म्हणून अर्ज केला होता. मात्र उच्च न्यायालयाने ही तिचा जामीन अर्ज फेटल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी तिच्या अटकेची कारवाई गुरुवारी पूर्ण केली. या अटकेमुळे तिचे निलंबन अटळ असल्याचे सांगण्यात येते