पुणे ते करमाळी मार्गावर ख्रिसमस स्पेशल ट्रेन

 

 

चिपळूण : ख्रिसमसनिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे साप्ताहिक विशेष ट्रेन चालवणार आहे. पुणे-करमाळी साप्ताहिक (ट्रेन क्रमांक ०१४०७) स्पेशल ट्रेन २५ डिसेंबर ते ८ जानेवारी दरम्यान (तीन ट्रिप) दर बुधवारी पुण्याहून सकाळी ५ वाजून १० मिनिटांनी निघणार आहे.

 

त्याच दिवशी रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी करमाळीला पोहोचणार आहे. तर करमाळी-पुणे साप्ताहिक (ट्रेन क्रमांक ०१४०८) विशेष ट्रेन २५ डिसेंबर २०२४ ते ८ जानेवारी २०२५ (तीन फेऱ्या) दर बुधवारी करमाळी येथून रात्री १० वाजून २० मिनिटांनी सुटणार आहे.

 

दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता पुण्याला पोहोचणार आहे. या गाडीला चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम आदी स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत.