वंचित बहुजन आघाडीचा एल्गार
जिल्हाध्यक्ष विकास अण्णा जाधवांचे कार्यकर्ते लागले कामाला
संतोष कुळे | चिपळूण : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दि. १६ मे १९३८ मध्ये चिपळूणमधील सध्याचे ठिकाण खेर्डी आणि त्यावेळी हत्तीचा माळ म्हणून उल्लेख असलेल्या माळावरती खोतीची परिषद घेतली होती. या परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी हाताळले होते. आता पुन्हा एकदा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी खोती प्रश्नावरती आपला मोर्चा वळवला असून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास (अण्णा) जाधव यांनी खोती प्रश्नावरती कामाला सुरुवात केली आहे. लवकरच या संदर्भातली माहिती संकलन करून ॲड. प्रकाश आंबेडकर खोती प्रकरण गाजवणार आहेत.
वंचित बहुजन आघाडी पक्षाच्यावतीने चिपळुणात झालेल्या भव्य कुणबी उन्नती हक्क परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी कोकणात खोती प्रकरणावर काम करणार असून येथील नागरिकांना न्याय मिळवून देणार असल्याची घोषणा केली होती. तसेच त्यांनी पदाधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या होत्या. त्यानुसार येथील पदाधिकाऱ्यांकडून खोती प्रकरणावर काम करण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास अण्णा जाधव यांनी दिली. कोकणामध्ये पूर्वापार चालत आलेली खोती पद्धत बंद करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा उभारला. त्यांच्यामुळे भूमिहीन असणारा कोकणातील कुणबी, बहुजन, अस्पृश्य समाज पहिल्यांदाच जमिनीचा मालक झाला. १६ मे १९३८ ला खेर्डी (ता. चिपळूण) येथील हत्ती माळावर खोती विरोधी परिषद झाली. ती सर्वत्र गाजली. या परिषदेतील बाबासाहेबांचे दीड तास भाषण झाले. कुळांच्या नेमक्या शोषणावर आणि त्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सखोल विवेचनाने बोट ठेवले होते. त्यांच्या प्रज्ञेचा आणि अभ्यासाचा अनुभव कोकणला यानिमित्ताने मिळाला. १९२७ मध्ये मुंबई विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर खोतीविरोधी लढा सुरू केला.
कोकणातील वेगवेगळ्या समूहांच्या परिषदा घेऊन खोतीविरुद्ध संघर्ष पुकारला.
त्याचवेळी मुंबई विधिमंडळातही संसदीय मार्गाने संघर्ष चालू ठेवला. १३ व १४ एप्रिल १९२९ रोजी भारतीय बहिष्कृत समाजसेवक संघाच्या विद्यमाने चिपळूणच्या मामलेदार कचेरीजवळ रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेचे दुसरे अधिवेशन भरण्यात आले होते. १९२७ मध्ये मुंबई विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर खोतीविरोधी लढा सुरू केला. कोकणातील वेगवेगळ्या समूहांच्या परिषदा घेऊन खोतीविरुद्ध संघर्ष पुकारला. त्याचवेळी मुंबई विधिमंडळातही संसदीय मार्गाने संघर्ष चालू ठेवला. १३ व १४ एप्रिल १९२९ रोजी भारतीय बहिष्कृत समाजसेवक संघाच्या विद्यमाने चिपळूणच्या मामलेदार कचेरीजवळ रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेचे दुसरे अधिवेशन भरण्यात आले होते. १९२७ मध्ये मुंबई विधान परिषदेवर निवडून गेल्यानंतर खोतीविरोधी लढा सुरू केला. कोकणातील वेगवेगळ्या समूहांच्या परिषदा घेऊन खोतीविरुद्ध संघर्ष पुकारला. त्याचवेळी मुंबई विधिमंडळातही संसदीय मार्गाने संघर्ष चालू ठेवला. १३ व १४ एप्रिल १९२९ रोजी भारतीय बहिष्कृत समाजसेवक संघाच्या विद्यमाने चिपळूणच्या मामलेदार कचेरीजवळ रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेचे दुसरे अधिवेशन भरण्यात आले होते. तरी आजही होती प्रश्न
कोकणामध्ये भेडसावत आहे. खोत यांच्या ताब्यात असलेल्या जमिनी आणि त्यामुळे होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक याबाबत आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा भाष्य केल्यानंतर आता खोती प्रकरणाला उजाळा मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेती करणाऱ्या आणि खोतीच्या प्रश्नाबाबत प्रलंबित असणारे प्रश्न सोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सरसावली असून रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास जाधव यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाच तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना खोती प्रश्नबाबत संपर्क करण्याची सुद्धा त्यांनी आवाहन केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी खोती प्रकरणावर काम करण्यासाठी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाच तालुक्यांच्या विभागातील पाच सूज्ञ लोकांची निवड करणार असल्याचे सांगितले.
तसेच या लोकांची रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकामध्ये बैठक आयोजित करुन त्यांना खोती प्रकरणावर कायद्यांतर्गत मार्गदर्शन करु, असेही ते म्हणाले होते. त्यानुसार वंचितचे व पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खितपत पडलेला जमीन कूळ वाहिवाटीनुसार कूळ कायद्यांतर्गत (खोती प्रकरणाबाबत) वाड्या, वस्ती, विभाग, तालुकास्तरावर उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास अण्णा जाधव आणि त्यांचे सहकारी उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गमरे, जेष्ठ समाजसेवक अविनाश आदवडें प्रमुख मार्गदर्शक, भिकू हुमणे, नितीन जाधव (महासचिव), विशाल मोरे (समाजसेवक) जनजागृती करीत आहेत. खऱ्या मालकाला त्याचे हक्क मिळवून देणे आणि खोती प्रकरणाच्या भयभीत वातावरणातून मुक्तता करून घेण्याकरिता वंचित बहुजन आघाडी पक्ष कुणबी समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहील, असे विकास अण्णा जाधव म्हणाले. कुणबी समाजाला खोती प्रकरणाबाबत नक्की न्याय मिळवून देऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. अधिक माहितीसाठी ७२७६६०९१९१, ७३७८७६२३५४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विकास अण्णा जाधव यांनी केले आहे.