उबाठा गटातील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

 

खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील ऐनवली व मोहाने गावातील शिवसेना उबाठा गटातील कार्यकर्त्यांनी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन शाखाप्रमुख हनुमान मोरे यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

यावेळी खेड तालुका सरचिटणीस शशांक सिनकर यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शाखाप्रमुख हनुमान मोरे, शाखाधिकारी गणेश मोरे, युवा सेना विभाग अधिकारी सचिन शिंदे, सचिन मोरे ऐनवली, अजय सागवेकर, सौ स्वाती शिंदे,सौ उज्वला मोरे,सौ संजना मोरे आदींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे दिनेश पोफळकर, सुदेश धोत्रे, सदानंद दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.