राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपालीताई चाकणकर १७, १८ व १९ डिसेंबर रोजी कोकण दौऱ्यावर

 

१९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग नगरी येथे बैठक.

मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी व्हावे. -राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक. 

सिंधुनगरी l प्रतिनिधी.:

 

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्याअध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष श्रीमती रूपालीताई चाकणकर या तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर असून दिनांक १९ डिसेंबर रोजी सिंधुनगरी येथे नवीन जिल्हा नियोजन सभागृहात त्यांच्या उपस्थितीत एक बैठक होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या विविध प्रश्नांबाबत ही बैठक महत्त्वाची असून, या बैठकीस जिल्ह्यातील महिलांनी उपस्थित रहावे व आपले प्रश्न मांडावेत असे आवाहन राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व राष्ट्रवादी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष श्रीमती प्रज्ञाताई परब यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

श्रीमती रूपालीताई चाकणकर यांच्या कोकण दौरा पार्श्वभूमीवर सिंधुनगरी येथील बैठक त्यानंतर वेंगुर्ले येथे कार्यकर्त्यांशी होणारा संवाद त्याचा नियोजनाची बैठक मंगळवारी झाली. त्यानंतर त्यांच्या दौऱ्या बाबतची व या नियोजनाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई परब यांनी या दौऱ्याबाबत विस्तृत माहिती दिली. जिल्ह्यातील महिलांनी आपल्या तक्रारी घेऊन या बैठकीत दाखल व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

दिनांक १७ डिसेंबर पासून श्रीमती रूपालीताई चाकणकर कोकण दौऱ्यावर आहेत. १७ डिसेंबर रोजी रायगड, १८ डिसेंबर रोजी चिपळूण व रत्नागिरी येथे, त्यानंतर १९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुदुर्ग नगरी येथील जिल्हा नियोजन समिती सभागृह सकाळी ११ ते ३ या वेळात बैठक, दुपारी ३ ते ४ या वेळात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, त्यानंतर वेंगुला येते सभागृहात ४.३० ते ५.३० या वेळात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसोबत व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेणार आहेत. सिंधू नगरी येथे किंवा वेंगुर्ला येथे ज्या महिलांवर अन्याय झाला असेल व तक्रारी असतील तर त्या महिलांनी या बैठकीसाठी सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेवेळी प्रदेश सचिव सुरेश गवस, जिल्हा सरचिटणीस संदीप राणे, कुडाळ अध्यक्ष आर के सावंत, एमडी सावंत, कणकवली अध्यक्ष राजेंद्र पावसकर, सावंतवाडी अध्यक्ष उदय भोसले, दोडामार्ग अध्यक्ष सत्यवान गवस, मालवण अध्यक्ष नाथा मालनकर, गणेश पवार, साधना शिरोडकर, वैभव रावराणे, ऋतुजा शेलटकर, रीद्दी परब, पूजा पेडणेकर, श्रेया मुद्रस, सर्वेश पावसकर, विलास गावकर, सुवर्णा पराडकर, स्नेहल पताडे, रंजना निर्मल, धनराज चव्हाण आधी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.