डॉ. सुबोधन कशाळीकर यांना  मातृशोक 

सावंतवाडी: शहरातील प्रसिद्ध वैद्य कै. डॉ. श्रीपाद कशाळीकर यांच्या पत्नी श्रीमती सुचेता श्रीपाद कशाळीकर (वय ८५) यांचे आज माठेवाडा येथील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुलगे,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. डॉ. सुबोधन कशाळीकर, मेडिकल व्यावसायिक मकरंद कशाळीकर आणि अनिरुद्ध कशाळीकर यांच्या त्या मातोश्री होत.

दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर येथील उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे.