स्वतः च्या वाढदिवशी केले विद्यार्थ्यांना श्रीमद भगवत गीतेचे वाटप
चिपळूण (वार्ताहर ) : तालुक्यातील खेर्डी जिल्हा परिषद शाळा खेर्डी दातेवाडी व जि. प. खेर्डी शिगवणवाडी येथील शाळेमधील विद्यार्थि यांना भाजपा रत्नागिरी जिल्हा चिटणीस विनोद भुरण यांनी स्वतच्या वाढदिवशी
श्रीमद् भगवत् गीतेचे वाटप करून हिंदू धर्माचे महत्व करून दिले.
हिंदू संस्कृती आणि धर्माचे ज्ञान शालेय जीवनापासून व्हावे यासाठी एक स्तुल्य उपक्रम भाजपा जिल्हा चिटणीस विनोद भूरण यांनी राबवला आहे. यातून त्यांनी हिंदू धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न केला आहे. खेर्डी शिगवणवाडी आणि दातेवाडी शाळेत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ.स्नेहा मेस्त्री, खेर्डी ग्रामपंचायतच्या सदस्या माजी सरपंच सौ. वृंदा दाते, खेर्डी ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्या माजी सरपंच सौ. अपर्णा दाते, इस्कॉन संस्थेचे जिल्हा प्रसारक प्रभु, माजी सरपंच रविंद्र फाळके, माजी सरपंच सुनिल मेस्त्री, माजी उपसरपंच अनंत दाते, ह.भ.प लक्ष्मण महाराज चिले, ह.भ.प.श्री.विजय महाराज काणेकर , ह.भ.प नंदकुमार ठसाळे, खेर्डी गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष काशिनाथ दाते, सुखाई देवस्थानचे विश्वस्त सुधाकर दाते, माजी सैनिक विजय भुरण, शांताराम भुरण, मधुकर भुरण, मनोहर शिगवण, सुरेश भुरण, प्रदीप भुरण, राजेंद्र ठसाळे, सुरेंद्र चिले, श्री.संजय दाते,भारतीय जनता पार्टीचे सर्व बुथ अध्यक्ष, संजय शिगवण, संजीवन दाते, अक्षय नाचरे, सुमित चिले, राकेश भुरण शिगवण वाडी चे ग्रामस्थ , दिलिप शिगवण, प्रकाश शिगवण, गोपाळ शिगवण, बाळा भैरवकर, श्री.सुरेश जडे, सर्व सहकारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते. सर्वांनी विनोद भुरण यांचे आभार मानले आहेत.












