खेड – खोपी मार्गावर इर्टिगा कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

 
 
कार चालकावर गुन्हा
खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील वेरळ-खोपी मार्गावर इर्टिगा  कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार सागर घन: श्याम खेडेकर (४१) हा ठार झाल्याची घटना २ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ४ वाजता घडली होती. या प्रकरणी कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू भागोजी केदारी (३८) असे गुन्हा दाखल झालेल्या चालकाचे नाव आहे. खेड पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ॲक्टिव्हा गाडीवरील चालक सागर घन:श्याम खेडेकर (४१) हा वेरळ ते खोपी असा प्रवास करीत असताना खोपीवरून वेरळच्या दिशेने येणारी मारुती सुझुकी कंपनीच्या इर्टिगा गाडीवरील चालक राजू भागोजी केदारी (३८) याने आपला ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून समोरून येणाऱ्या होंडा कंपनीच्या अँक्टिव्हा गाडीवरील चालक सागर घनःश्याम खेडेकर याला ठोकर देऊन अपघात केला आणि अपघात ठिकाणी न थांबता पळून गेलेला आहे. या अपघातात सागर घनःश्याम खेडेकर (४१) याला लहान मोठ्या गंभीर दुखापती होवून त्यामध्ये तो मयत झालेला आहे. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.