रत्नागिरीकर मंगळवारी रात्री तीव्र वासाने हैराण

 

 

वासाचा नेमका उगम कुठला की पुन्हा वायु गळती ? रत्नगिरीकरांमध्ये चर्चेला उधाण 

रत्नागिरी | प्रतिनिधी

तालुक्यातील जयगड येथील जिंदाल कंपनीतील वायू गळती प्रकरण ताजे असतानाच आता मिरजोळे एमआयडीसीतून मंगळवारी रात्री रत्नागिरी शहर आणि परिसरातील नागरिकांना तीव्र वासचा त्रास झाला. वायू गळतीमुळे हा वास वेगाने पसरला असावा असे सांगण्यात येत होते. रत्नागिरी एमआयडीसी परिसर आणि कुवारबाव ते मारुती मंदिर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात वास येऊ लागल्याने नागरिक हैराण झाले. मात्र हा वास नेमका कुठून येत होता याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध झाली नाही.

मंगळवारी ९.३० वाजल्यापासूनच नागरिक या वासाने हैराण झाले आहेत.याची माहिती मिळताच प्रांत जीवन देसाईं  यांनी तहसीलदार राजाराम म्हात्रे , ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव , अग्निशमन बंब यांना तात्काळ घटनस्थळी दाखल रवाना केले. वायू गळती नेमकी कोठून होत आहे . याचा शोध  यंत्रणा घेत आहे.