संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन,अॅड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय स्पर्धे मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
संगमेश्वर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ विद्यासमिती यांचे तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये कथाकथन स्पर्धेत प्राथमिक गटात इयत्ता ५ ते ७ वी या वयोगटात कु कल्याणी सचिन साठे प्रथम,माध्यमिक गटात इ.८ ते १० वी मध्ये जान्हवी प्रभाकर आलीम द्वितीय,हस्ताक्षर स्पर्धेत प्रथमिक गटात आदिती सुरेश कातकर द्वितीय,निबंध स्पर्धेत प्राथमिक गटात प्रांजली विजय कवळकर हिला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक सचिन साठे यांचे ,मुख्याध्यापिका सौ रुही पाटणकर,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,संस्था अध्यक्ष किशोर साठे,व अन्य संचालक यांनी अभिनंदन केले आहे.











