रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील जयगड येथील समुद्रात मच्छिमारी बोटीवरुन पडून बेपत्ता झालेल्या खलाशाचा मृतदेह तब्बल सात दिवसांनी मिळून आला.
राम शिवा डंगोरी (41,मुळ रा.कैलाली नेपाळ सध्या रा.मिरकरवाडा,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे. बुधवार 11 डिसेंबर रोजी राम डंगोरी हा मिरकरवाडा येथील मच्छिमारी बोटीवरुन मच्छिमारी करण्यासाठी जयगड येथे गेला होता. मच्छिमारी करत असताना त्याचा तोल गेल्याने तो समुद्रात पडून बेपत्ता झाला होता. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची खबर त्याच्या सहकार्यांनी दिली होती. दरम्यान, मंगळवार 17 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. सुमारास बेपत्ता झालेल्या डंगोरीचा मृतदेह जयगड येथील समुद्रात मिळून आला. याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.











