करुळ येथे १७ रोजी फार्मर आयडी नोंदणी व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन 

वैभववाडी l प्रतिनिधी :      ग्रामपंचायत करूळ यांच्या वतीने बुधवार दि. १७ सप्टेंबर रोजी फार्मर आयडी नोंदणी शिबिर व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

      सातबारा धारक सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी नोंदणी करता येणार आहे. यासाठी आधारकार्ड, मोबाईल, ७/१२ व ८ अ आदी कागदपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे.

तसेच ग्रामपंचायत करूळ व आयुष्यमान आरोग्य मंदिर करूळ यांच्या वतीने बुधवारी सकाळी १० ते २ या वेळेत मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबिरात वैभववाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे तज्ञ डॉक्टर उपस्थित रहाणार आहेत. दरम्यान आरोग्य विभागामार्फत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड, आयुष्यमान भारत योजना कार्ड, वयवंदना कार्ड आदी कार्ड नागरिकांना काढून देण्यात येणार आहेत. यासाठी आधारकार्ड, रेशनकार्ड व मोबाईल घेऊन येणे आवश्यक आहे. तरी या शिबिराचा गावातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच नरेंद्र कोलते यांनी केले आहे.