
प्रतिनिधी – मंडणगड : तालुका विकास मंडळ F-1428 मुंबई संचालित पणदेरी – पेवे पंचक्रोशी हायस्कूल पणदेरी या विद्यालयाने शासकीय आश्रमशाळा वेरळ येथे आयोजित 52 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश संपादन करून प्रशालेचे नाव उज्वल केले आहे. माध्यमिक गटात कुमारी सायली शिगवण व कुमार बबन राळे यांनी बनविलेल्या *बहुउद्देशीय खुर्ची या मॉडेल ने द्वितीय क्रमांकाचे* पारितोषिक पटकावले तर प्राथमिक गटात कुमारी आर्या सवणसकर व कुमारी श्रुति तांबे या दोघीनी बनवलेल्या *घरगुती वॉशिंग स्प्रे या मॉडेल ला तृतीय क्रमांकाचे* पारितोषिक प्राप्त झाले. दोन्हीही मॉडेल जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनास पात्र ठरले आहेत. या दोन्हीही मॉडेल साठी विज्ञान शिक्षक शिक्षक *श्री.इंगळे सर* यांनी मार्गदर्शन केले.
विशेष म्हणजे पणदेरी पेवे पंचक्रोशी हायस्कूल ने विज्ञान प्रदर्शन मध्ये *सलग 3 वर्ष* पारितोषिक पटकावून प्रस्थापित शाळांना धक्का देत *हॅटट्रिक* साजरी केली आहे.
प्रशालेच्या या यशाबद्दल संस्था, शालेय समिती, प्रशालेचे मुख्याध्यापक, शिक्षक पालक संघ ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक, माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.












