राजापूर (वार्ताहर): येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. या शिबीरात ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
धन्वंतरी धर्मादाय संस्था रत्नागिरी आणि वैभवलक्ष्मी रक्तपेढी कोल्हापूर यांच्या सहकार्याने राजापूर हायस्कुल येथे रविवारी हे शिबीर पार पडले. या शिबीराचे उद्घाटन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मधुकर देवरूखकर आणि धन्वंतरी धर्मादाय संस्थेचे अध्यक्ष अजय भिडे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी रमेश गुणे, जितेंद्र मालपेकर, अनंत रानडे, आ. के. मराठे, दत्तात्रय रानडे, विनायक बेडेकर, अड. राजन देवरूखकर, सुभाष पवार, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष दिनानाथ कोळवणकर, दत्तात्रय रानडे, सुभाष पवार, प्रकाश लोळगे, राजन रानडे, रविंद्र रानडे आदींसह मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थीत होते.
या शिबीरात सहा. पोलीस निरिक्षक सुधीर उबाळे, शेतकी अधिकारी सतिश तिष्ठक, मुख्याधिकारी चेतन विस्पुते, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, दिनानाथ कोळवणकर, हिंदु जनजागृती समितीचे विनोद गादीकर, महेश मयेकर, अड. प्रशांत पाध्ये, डॉ. अभय अळवणी आदींसह सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, महावितरण, एसटी विभागातील कर्मचारी तसेच महिला, तरूणांनी उपस्थीत राहत रक्तदान केले. या रक्तदात्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी आपला शतक महोत्सव साजरा करत आहे. केवळ गणेशोत्सवापुरते सिमीत न राहता या मंडळाने मागील ९९ वर्षात विविधा सामाजिक, सांस्कृतिक, प्रबोधनात्मक उपक्रम राबवत आपले वेगळेपण जपले आहे. शतक महोत्सवी वर्षात रक्तदान शिबीरासारखा उपक्रम राबवून तो यशस्वी केला आहे. वर्षभरात अशीच सामाजिक जाणीवा जपणारे व सांस्कृतिक मुल्ये जपणारे उपक्रम मंडळाचे वतीने हाती घेतले जाणार आहेत. शिबीरासाठी राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ व वैभवलक्ष्मी रक्तपेढीचे कर्मचारी आणि धन्वंतरी संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबीर यशस्वीतेसाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.












