खेड(प्रतिनिधी) ख्रिसमससह नववर्ष स्वागतासाठी गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मध्यरेल्वे प्रशासनाने एलटीटी- करमाळी स्पेशलच्याही १८ फेऱ्या जाहीर केल्या आहेत. स्पेशल २३ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत नियमितपणे धावणार आहेत. २१ डिसेंबरपासून आरक्षण खुले झाले असल्याने प्रवाशांना दिलासा मिळला आहे.
नाताळसह नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांमुळे नियमित गाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी. यापूर्वीच सीएसएमटी- करमाळी, साप्ताहिक,गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यात एलटीटी-करमाळी स्पेशलच्या १८ फेऱ्यांची भर पडल्याने फेऱ्यांची संख्या ६६वर पोहचली आहे. यामुळे पर्यटक सुखावले आहेत.
एलटीटी-करमाळी स्पेशल २३ पासून नियमित धावणार आहे. एलटीटीहून सायंकाळी ३.३० वा. सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वा. करमाळीला पोहचेल. परतीच्या प्रवासात २४ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत धावणारी स्पेशल करमाळी येथून सकाळी ६.४५ वा. सुटून त्याचदिवशी रात्री १०.१५ वा. एलटीटीला पोहचेल. ती ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, पुणे-करमाळी सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी,थिविम या स्थानकांत थांबणार आहे











