‘सीएसएमटी-करमाळी’ला पहिल्या दिवशी धावली ‘लेट’

खेड(प्रतिनिधी) नाताळसह नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण मार्गावर सुरू झालेल्या सीएसएमटी-करमाळी स्पेशलला पहिल्याच दिवशी ४ तास ‘लेट धावली  यामागचे नेमके कारण समजू शकले नाही. या स्पेशलपाठोपाठ अन्य ५ रेल्वेगाड्यांच्या. सेवांवरही परिणाम झाला.
 तिरुवअनंतपूरम- एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस १ तास १५ मिनिटे, दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस १ तास उशिराने रवाना झाल्या. सीएसएमटी- मडगाव मांडवी एक्स्प्रेस १ तास ३० मिनिटे तर दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस १ तास ४० मिनिटे विलंबाने धावली. तिरुवअनंतपूरम-निजामुद्दीन साप्ताहिक स्पेशलही १ तास उशिराने रवाना झाली.