सिंधुदुर्ग (प्रतिनिधी):
राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्गचे अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक सिंधुदुर्ग यांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी मौजे दारिस्ते कनेडी मार्गावरील आतील कच्च्या रस्त्यावर मोठी कारवाई केली.
यावेळी, एका मारुती ओम्नी वाहनात गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे एकूण ४१ बॉक्स (एकूण ३६९ बाटल्या) सापडले. या मुद्देमालाची एकूण किंमत ४,४६,००० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
गुन्ह्याचा तपशील:
गुन्हा नोंदविण्याची तारीख: 27 डिसेंबर 2024
एकूण गुन्हे: 1
वारस माल: 1
बेवारस माल: 0
आरोपी: फरारी
वाहन: मारुती ओम्नी (चारचाकी)
पथकाने वाहन व मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, गुन्ह्यातील आरोपी फरारी असून त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तपास सुरू केला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात मद्य तस्करी रोखण्यात यश आले आहे.












