प्रत्येक विद्यार्थ्याला संगणक ज्ञान असणे आवश्यक – पटेल.
कै .सत्यवान लाड यांचे स्मरणार्थ श्री . दिपक सत्यवान लाड, श्री . महेश सत्यवान लाड, श्री . सचिन सत्यवान लाड यांजकडून शाळेला दोन संगणक संच !
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — शाळेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार संगणक ज्ञान असणे प्रत्येक मुलासाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी कृषी सभापती व विद्यमान शिवसेना कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा प्रमुख संदेश पटेल यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना काढले . प्रथमतः मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री . संजय सावंत सर यांनी केले.आणि प्रशालेला देणगी स्वरूपात संगणक दिल्याबद्दल लाड कुटुंबियांचे आभार मानले. मान्यवरांचे हस्ते श्री . दिपक लाड, महेश लाड, श्री सचिन लाड यांचा शाळेला संगणक दिल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.श्री संदेश पटेल माजी कृषी सभापती यांचा कार्यक्रमाच्या दिवशी वाढदिवस असल्याने सर्व मान्यवर शिक्षक, ग्रामस्थ-पालक -विद्यार्थी यांच्याकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या . संगणक दाते श्री .महेश लाड यांनी सुद्धा, आपल्या शाळेतील मुलांना डिजिटल शिक्षण मिळावे यासाठी संगणक प्रदान केले असल्याचे सांगितले . व शाळेप्रती आपले कर्तव्य निभावले असल्याचे सांगितले. मान्यवरांचे व ग्रामस्थांचे स्वागत श्री. निलेश कडूलकर सर यांनी केले.सदरच्या संगणक प्रदान कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या सौ स्नेहलता पांचाळ, श्री किशोर लाड, श्री हनुमंत लाड, श्री लक्ष्मण लाड , श्री गुरुनाथ मेस्त्री, सौ.प्रिति फोंडेकर ,सौ साक्षी पाताडे, सौ.मानसी लाड , सौ. विशाखा लाड,सौ.
संजना लाड, सौ. गौरी फोंडेकर,सौ .ज्योत्स्ना लाड, श्रीमती भारती गुरव व विद्यार्थी उपस्थित होते . प्रशालेच्या पदवीधर शिक्षिका सौ. दर्शना हुंबे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकल्याने फोनद्वारे संगणक दात्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रशालेचे उपशिक्षक श्री श्रीकृष्ण ठाणेकर यांनी मानले . या कार्यक्रमाला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यांनी समाधान व्यक्त केले.










