औचित्य श्री देव ब्राह्मण मंदीर वार्षिक उत्सव.
ओटवणे (प्रतिनीधी) ओटवणे शेरवाळवाडी तेथील श्री देव ब्राह्मण मंदिराचा वार्षिक उत्सव आज १० मे रोजी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न होत आहे.
या कार्यक्रमाबरोबरच या कार्यक्रमाधील आकर्षण म्हणजे रात्रौ ९.३० वाजता सादर होणारा स्वतः मालक बाबी कलींगण प्रस्तुत श्री कलेश्वर पारंपरिक दशावतार नाटय मंडळ नेरूर यांचा ट्रिकसिन युक्त दशावतार नाटय प्रयोग “त्रिखुर ब्रह्मांड प्रलय”यातील आकर्षण म्हणजे त्रिखुराची च्छर्या, हंसावरून चतूर्मुख ब्रह्मदेवाचे आगमन, ब्रह्मांड अस्त्राची निर्मिती,सत्यलोकात कमळात चतुर्भुज ब्रह्मदेव, ब्रह्मांड प्रलय (वावटळ), आगळ वेगळ शिवदर्शन, महविराट त्रीपुर सुंदरी दर्शन, बगलामुखी देवीचा पितांबरी अवतार, सूक्षमदर्शी कीडा क्षणार्धात महाकाय होणे अशा एकूण १६ ट्रिकसीन ने नटलेल्या या आगळ्या वेगळ्या नाटय कलाकृतीचा लाभ घेण्याचे आवाहन शेश साक्षात्कार सेवा समिती आणि शेरवाळवाडी ग्रामस्थ यांच्याकडून कऱण्यात आले आहे.










