भयंकर ! १२ वर्षीय बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत सख्ख्या भावानेच केली हत्या

Terrible! Suspecting the character of the 12-year-old sister, Sakhkhya’s brother killed her

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये सख्या भावानेच 12 वर्षीच्या लहान बहिणीला मारहण करत हत्या केला आहे. पहिल्यांदाच मासिक पाळी आलेल्या 12 वर्षीय बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत भावाने केलेल्या बेदम मारहाणीत बहिणीचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

12 वर्षीय मृत मुलगी ही आपला मोठा भावासोबत उल्हासनगरमध्ये राहत होती. मुलीला काही दिवसांपूर्वीच मासिक पाळी आली होती. त्यावेळी  कपड्यांवर रक्ताचे डाग पाहून भावाने आपल्या लहान बहिणीला याबाबत विचारणा केली. पण मुलगी वयाने अगदीच लहान असलेल्या तिला आपल्या शरीरात झालेले बदल भावाला सांगता येत नव्हते.

मात्र भावाच्या बायकोने शंका व्यक्त करत सांगितले की तुमच्या बहिणीचं काहीतरी प्रेम प्रकरण सुरू आहे आणि जो काही रक्तस्त्राव होतोय तो शारीरिक संबंध झाल्यामुळे होत आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर भाऊ हा प्रचंड संतापला त्यानंतर त्याने आपल्या बहिणीला प्रचंड मारहाण सुरू केली.

‘तुझे शारीरिक संबंध झाले आहेत का?’ अशी सतत विचारणा तो तिला करत होता मात्र ती लहान असल्याने तिला घडलेला प्रकार सांगता येत नव्हता. तरी देखील तो तिला मारत राहिला आणि त्याच मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला.

यानंतर भावाने तिला मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. तर तिचा पोस्टमॉर्टम केला असता त्यात तिच्या तोंडावर, मानेवर, पाठीवर चटके दिल्याच्या आणि मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. त्यामुळं डॉक्टरांनी याबाबत मध्यवर्ती पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी या निर्दयी भावाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे ७ मे रोजी घडली आहे.