खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील बोरघर, चिंचवली तसेच वावे तर्फे नातू ता. खेड येथील रस्ते, पूल व अनेक विकासकामांना निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत असून या कामांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे या कामाना निधी देण्याचे आश्वासन पाटील यांनी भाजपा चे जेष्ठ कार्यकर्ते माजी सरपंच उदय बोरकर यांना दिले आहे
.
प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ८६ – बोरघर-चिंचवली-शिंगरवाडी-वावे तर्फे नातू फाटा, ता. खेड या मार्गावरील बोरघर ग.ह. पवार हायस्कूल लगतचे पाताळी नदीवरील पूलाची पुनर्बांधणी करणे – रक्कम ५कोटी, वावे तर्फे नातू फाटा लगतचे पाताळी नदीवरील पूलाची पुनर्बांधणी करणे. – रक्कम ५ कोटी, बोरघर-चिंचवली-शिंगरवाडी-वावे तर्फे नातू फाटा, ता. खेड मार्गाचे ६ किमी. मजबूतीकरण व डांबरीकरण करणे. – रक्कम ३ कोटी,
बोरघर, स्मशानभूमीत विद्युत-दहन सुविधा व शेडची बांधणी करणे. – रक्कम ३० लाख, बोरघर, स्मशानभूमीत पोहचण्यासाठी मुख्य रस्ता ते स्मशानभूमी असा नदीवर साकव बांधणे. – रक्कम ५० लाख, बोरघर, स्मशानभूमीसाठी वॉल कंपाऊंड बांधणे. – रक्कम ५० लाख, बोरघर, स्मशानभूमीत पथदिवे बसविणे. – रक्कम ५ लाख, बोरघर येथे राष्ट्रीय महामार्ग ते गावदेवी मंदिर रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे. – रक्कम २० लाख, बोरघर, येथे राष्ट्रीय महामार्ग ते गावदेवी मंदिर गावदेवी मंदिर रस्त्याला संरक्षण भिंत बांधणे. – रक्कम ३० लाख, आदी १५ कामांसाठी १६ कोटी निधीची मागणी केली आहे.
सदरची कामे बजेटमध्ये व इतर योजनेतून पूर्ण करण्याचे आश्वासन आदरनिय श्री. धौर्यशील पाटील यांनी दिले असून सदर कामांबाबत खास चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. सदरच्या कामाबाबत श्री. पाटील तसेच रत्नागिरी उत्तर चे भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. केदार साठे यांनी सदरची कामे लवकरच मार्गी लावून भाजपा नेहमी विकासाचेच राजकारण करते हे दाखवून देऊ असे वचन दिले.
सदर कामांच्या मागणीसाठी निवेदन देतांना सोबत खेड भाजपाचे उपाध्यक्ष दिनेश पोफळकर, ज्येष्ठ कार्यकर्ते विकास तांबे, डॉ. गणेश मोरे, सुदेश धोत्रे, विश्वजित गुजर इत्यादी हजर होते. खेड भाजपाचे वतीने पाटील यांचे आभार मानण्यात आले.










