किल्ले रसाळगडवर ३१ डिसेंबर रोजी खडा पहारा मोहीम

 

खेड(प्रतिनिधी)

खेड तालुक्यातील किल्ले रसाळगड येथे ३१ डिसेंबर रोजी खडा पहारा आयोजित करण्यात आला असून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन दुर्ग प्रेमी वैभव सागवेकर यांनी केले आहे.

नवं वर्षा निमित्ताने मोठ्या प्रमाणात पर्यटक गडावर दाखल होत असतात कोणत्याही प्रकारचा धुडगूस व गडाचे पवित्र धोक्यात येऊ नये याची दक्षता घेण्यात आली आहे .तसेच साजरा करण्याच्या नादात गडकिल्ले खराब करू नका गडकोट नुसते दगड मातीचे नसून आपल्या महाराजांचे श्वास आहेत.तसेच ज्या गडकिल्यांवर महाराजांनी व पूर्वजांनी रक्त सांडलय ते गडकिल्ले पवित्र ठेवलेच पाहिजे असा संदेश या निमित्ताने देण्यात येणार आहे .