आदर्श विद्यामंदिर चिवेलीच्या चेअरमनपदी पत्रकार संतोष कुळे यांची निवड

चिपळूण : चिवेली पंचक्रोशी विकास मंडळ संचालित आदर्श विद्यामंदिर चिवेलीच्या शालेय समिती चेअरमन पदी पत्रकार संतोष (भाई) कुळे यांची नियुक्ती करण्यात आली.

स्व. यशवंत शिर्के यांच्या निधनानंतर चेरअमन पद रिक्त झाले. त्यानंतर संस्थेच्या पदाधिकारी यांनी या जागेसाठी संतोष कुळे यांची निवड केली.
पत्रकारिता क्षेत्रात काम करताना ते अनेक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील संस्थांमध्ये सुद्धा ते कामकाज करीत आहेत. आदर्श विद्या मंदिर चिवेलीच्या ते शालेय समितीमध्ये कार्यरत होते. मात्र आता त्यांची वर्णी चेअरमन पदी लागली आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा त्यांनी कामकाज केलेले आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक समस्या त्यांनी आतापर्यंत ग्रामीण भागातल्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत . नुकतीच त्यांची चेअरमन पदी नियुक्ती झाल्याबद्दल या संस्थेचे अध्यक्ष राजेश शिर्के, प्रमुख कार्यवाह रमेश शिर्के, सल्लागार अशोक वनगे ,रघुनाथ शिर्के, मोहन शिर्के, मंगेश शिर्के, संतोष गोरिवले, दत्ताराम फावरे, शाळे