वेंगुर्ले l प्रतिनिधी :वायंगणकर फिटनेस देवगड जामसंडे व कोकण सिंधू पावरलिफ्टींग असोसिएशन आयोजित भव्य दिव्य पावरलिफ्टींग स्पर्धा २०२४-२५ संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये वेंगुर्ले येथील नाईक जिम अँड फिटनेस सेंटर च्या चांगले यश मिळविले.
स्पर्धेमध्ये गौरवी मांजरेकर या स्पर्धकांने – ५२ किलो वजनी गट सब – ज्युनिअर तिसरा क्रमांक ( ब्राँझ मेडल), सिनियर ग्रुप द्वितीय क्रमांक (सिल्व्हर मेडल), अस्मी थल्हा या स्पर्धकांने – ७२किलो वजनी गट सब – ज्युनिअर प्रथम क्रमांक( गोल्ड मेडल), समर राणे या स्पर्धकांने – ५९ किलो वजनी गट सब – ज्युनिअर तृतीय क्रमांक ( ब्राँझ मेडल), विनय जाधव या स्पर्धकांने – १००kg वजनी गट ज्युनिअर द्वितीय क्रमांक ( सिल्व्हर मेडल), देवेंद्र तुळसकर या स्पर्धकांने – ५३ किलो वजनी गट सब – ज्युनिअर उत्तेजनार्थ, हृतिकेश पालव या स्पर्धकांने -६६ किलो वजनी गट ज्युनिअर उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. स्पर्धकांना ईश्वर माने सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यश प्राप्त स्पर्धकांचे नाईक जिम अँड फिटनेस सेंटर च्या वतीने अभिनंदन करण्यात आले.











