मसूरे | झुंजार पेडणेकर
ग्रामपंचायत गोळवण – कुमामे – डिकवल येथे रोजगार हमी योजनेचे मंत्रालय मुंबई येथील सहाय्यक संचालक लेखा अधिकारी श्री. समीर भाटकर यांनी भेट देत विविध कामांची पाहणी केली. भेटी दरम्यान त्यांनी श्री. गणेश सुरेश तावडे यांच्या रोजगार हमी योजनेतून घेतलेल्या फळझाड लागवडीची पाहणी केली. तसेच श्री. विष्णू रामचंद्र परब यांच्या वैयक्तिक सिंचन विहिरीची पाहणी केली. झालेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायतीच्या कारभाराची प्रशंसा केली. सदरच्या भेटी दरम्यान ग्रामपंचायत गोळवण – कुमामे – डिकवल गावचे सरपंच श्री. सुभाष लाड, ग्रामसेविका श्रीमती. अर्पिता शेलटकर, उपसरपंच श्री. शरद मांजरेकर, कृषी पर्यवेक्षक श्री. बर्वे साहेब, तहसील मालवण च्या प्रतिनिधी श्रीमती सावंत मॅडम, कृषी सहाय्यक श्री. नितेश पाताडे, श्री. सौंगडे, ग्रा. पं. सदस्य श्री. साबाजी गावडे, कर्मचारी श्री. बाळाराम परब, श्रीमती. करुणा राणे, रोजगार सहाय्यक श्री. रामकृष्ण नाईक, कु. कोमल मांजरेकर, श्री. दत्ताराम परब, तसेच श्री. प्रकाश चिरमुले, श्री. बबन वरक, श्री. वामन वर्देकर श्री. संदेश पवार आदी उपस्थित होते.












