A Man from Mumbai who went for a bath in Bhogwe sea drowned…
परूळे | प्रतिनिधी : भोगवे नेवाळी येथील समुद्रात आंघोळीसाठी गेलेल्या मुंबई येथील इसमाचा बुडून मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे. भोगवे -नेवाळी येथे मुंबईवरून मित्रांकडे गावी मंदिरातील कार्यक्रमासाठी आले होते. मर्यक्रमानंतर दुपारी ३ वाजता आंघोळीसाठी गेलेले उमेश हरिश्चंद्र राणे वय वर्ष ५२ रा.
भांडुप मुंबई (मूळ कणकवली तालुक्यातील फोंडा लोरे) यांचा समुद्राच्या पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यु झाला. पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले. मात्र त्यांच्या सोबत असणाऱ्या चार जणांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे. देवाच्या कार्यक्रमा साठी ते भोगवे नेवाळी येथे आले होते. कार्यक्रमानंतर आंघोळी साठी गेले असता समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले सोबतच्या व्यक्तीनीआराडा ओरड करताच स्थानकांनी धाव घेतली व त्यांना बाहर काढले. मात्र उपचारासाठी नेताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या सोबत मुलगा व आई कार्यक्रमासाठी आले
होते. दरम्यान या बाबत माहिती मिळताच निवती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोस्टमार्टमसाठी मृतदेह परूळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आला. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक होते आहे.











