योगेश पेढांबकर जिल्ह्यातील गरिबांना ठरत आहे आधारवड 

दापोली मुरुड येथील कुटुंबाला दिली नोकरी मिळवून परत  

चिपळूण (वार्ताहर): दापोली तालुक्यातील रहिवासी विजय नारायण पवार हे ग्रामपंचायत मुरुड ,हर्णे -दापोली येथे सन१९९० पासून ग्रामपंचायत शिपाई म्हणून नोकरीवर होते. मे-१९९० पासून नियमितपणे ते सेवा बजावत होते. मात्र, त्यांना

अचानक १ जून २०२३ पासून शिपाई पदाच्या नोकरीवरून कार्य मुक्त केल्याचे पत्र देण्यात आले. त्यामुळे श्री. पवार यांच्या कुटुंबियांना धक्काच बसला. परंतु याबाबत माहितीचा अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पेढांबकर यांनी या कुटुंबाला न्याय मिळवून देत पुन्हा नोकरीवर घेण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे पवार कुटुंबाने त्यांचे आभार मानले आहेत.

 

 

विजय नारायण पवार हे आपली नोकरी प्रामाणिकपणे करत होते. परंतु त्यांना १ जून २०२३ पासून कार्यमुक्त करण्यात आल्याचे पत्र देवून कामावरून कमी करण्यात आले. याबाबत त्यांनी वारंवार विनवणी केली असता कामावर घेण्यात आले नाही. त्यानंतर त्यांना चिपळूण येथील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार निस्वार्थी चळवळ महाराष्ट्र राज्य प्रमुख मार्गदर्शक व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष योगेश पेढांबकर यांची भेट घेत त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्याचे काम श्री.पेढांबकर यांनी केले व तुम्हाला नक्की न्याय मिळवून देईन अशी ग्वाही दिली.

गेली सातत्याने ग्रामपंचायत मुरुड, पंचायत समिती दापोली, व जिल्हा परिषद (ग्रा.पं)विभाग, रत्नागिरी यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करत श्री.पेढांबकर यांनी ८ महिन्यांमध्ये नवीन वर्षात १ तारखेला सदर विजय नारायण पवार यांना कामावर हजर राहण्यास सांगण्यात आले.

स्वतच्या अधिकार कक्षात राहून संघटनेच्या तत्वांनी काम करीत श्री.पेढांबकर यांनी या प्रकरणात पवार कुटुंबाला न्याय मिळवून दिला. कसलीही अपेक्षा न करता योगेश पेढांबकर यांनी कुटुंबाला आधार दिला. आयुष्यभर आम्ही तुम्हाला विसरणार नाही.असे कुटुंबीयांनी मनापासून सांगितले.

आहे.

गोरगरीबांना मदतीचा हात देणारे युवकांचे प्रेरणास्थान योगेश पेढांबकर यांचे हे अतिशय विधायक कार्य आहे.

तळागाळातील सामान्य नागरिकांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत नैतिकतेचे संबंध, जिव्हाळ्याचे संबंध जपणारे, अशी ओळख आज संपूर्ण महाराष्ट्रात श्री. पेढांबकर यांची आहे.

या विधायक कामाबद्दल विविध स्तरावरून त्यांचे विशेष कौतुक अभिनंदन करण्यात आले.