श्रीराम मंदिर मालघर येथे ९ ऑगस्ट रोजी अखंड श्री राम नाम जप यज्ञाचे आयोजन

चिपळूण (प्रतिनिधी) : श्री लक्ष्मी केशव देवस्थान शिरळ मालघर तालुका चिपळूण येथे प्रतिवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये होणाऱ्या अखंड श्री राम नाम जप यज्ञाचे शनिवार दि. ९ ऑगस्ट रोजी पहाटे ४ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ४ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. या अखंड श्रीरामनाम जपयज्ञाच्या निमित्ताने श्रीराम मंदिर मालघर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी श्रींची षोडशोपचारी पूजा करून धार्मिक कार्यक्रम संपन्न होतील. दुपारच्या वेळात देवस्थानची सभा संपन्न होईल. सायंकाळच्या वेळी आरती भजन संपन्न होईल. या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी, दुपारी व रात्री श्रीं च्या प्रसादाची व्यवस्थाही करण्यात येणार आहे . तरी सर्व रामभक्तांनी या अखंड श्री रामनाम जपयज्ञामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, श्रीराम नामाची जपमाळ ओढावी व हा अखंड श्री राम नाम जप यज्ञ यशस्वी करावा असे आवाहन शिरळ मालघर येथील रामभक्तां तर्फे करण्यात येत आहे.