Behind the temple of knowledge in Fondaghat there are drunkards!
मैदानासह रस्त्यावरील बाटल्या आणि काचांच्या खचा मुळे शाळेतील मुला-मुलींना गंभीर अपघाताची भीती–
शेजारील नागरिक सुषेगात ! कायमस्वरूपी कारवाईच्या प्रतीक्षेत
फोंडाघाट | कुमार नाडकर्णी : गेले कित्येक महिने येथील हायस्कूलच्या पिछाडीस असलेल्या इरिगेशन कॉलनी रस्ता आणि मैदानावर, संध्याकाळी अक्षरशः दारुड्यांचा खुलेआम हैदोस सुरू आहे. यामध्ये गावगुंडांच्या पुढार्यापासून नवी नवलाईची यूवाई आहारी गेल्याचे चित्र विदारक आहे. त्यातही लोक दारू आणि इतर साहित्यांची विल्हेवाट, काचा फोडून इतरत्र मैदान-रस्त्यावर फेकून जातात. ही बाब आरोग्याच्या दृष्टीने आणि समाजाच्या किंबहुना सर्वांच्याच दृष्टीने चिंताजनक आहे.
या ज्ञानमंदिराच्या मागील बाजूस लोरे-हवेलीनगर- बाजारपेठ इत्यादी ठीकाणाहुन विद्यार्थिनी- विद्यार्थी प्रशालेत येतात. काही वेळा त्यांना धावपळ करत शाळेची वेळ साधावी लागते. अशावेळी दुर्लक्षामुळे व रस्त्यातील मैदानावरील काचांच्या खचा मुळे पायांना गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या रस्त्यावरून रहिवाशांची सुद्धा याचाच सुरू असते. कोविड पासून चालत आलेल्या या कुप्रवृत्ती बद्दल यामुळे कोणीच आवाज उठवण्यास धजावत नाही. याचाच फायदा घेऊन संध्याकाळ नंतर रात्र उशिरापर्यंत या माळरानावर झुडुपात तसेच रस्त्यावर अवैध धंद्याबरोबर या मद्यपिच्या पार्ट्या रंगलेल्या असतात.
यावर लगतच्या प्रशालेच्या व्यवस्थापनाने रात्रपाळीच्या कामगाराकडून तसेच शेजारील ग्रामस्थांनी सतर्क होऊन पोलीस यंत्रणा- ग्रामपंचायत यांना कळविणे गरजेचे आहे. तसेच शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांसह समाजाच्या दृष्टीने सदैव “सद् रक्षणाय–” समर्थ असलेल्या स्थानिक– तालुका– जिल्हास्तरीय पोलीस विभागाने गांभीर्याने दखल घ्यावी, अचानक गस्त घालून कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे—–












