बापेरे गावचे ग्रामदैवत आई भवानी देवीचा १३ जानेवारी रोजी यात्रौत्सव

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील बापेरे गावचे ग्रामदैवत आई भवानी देवीची यात्रौत्सव १३ जानेवारी रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.

 

प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही ग्रामदैवत आई भवानी देवीचा यात्रौत्सव १३ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. या उत्सवांतर्गत सायंकाळी ७ते ८वाजता देवी जवळ दिवटी पेटवून गाह्याणे घातले जाते. यावेळी दिवट्या वाजत-गाजत घेऊन इतर देवस्थानाकडे मानवंदनेसाठी नेल्या जातात.दिवट्या परत आणल्यावर देवळा समोर असलेल्या भव्य पटांगणात ढोलताशांच्या तालावर नाचवल्या जातात. दिवटीवर भाविकांनी आणलेले तेल घातले जाते. यावेळी देवीला साकडे घालून गाह्याणे घातले जाते.हा कार्यक्रम आटोपल्या नंतर भजन, करमणुकीचे कार्यक्रम होणार आहेत.
या यात्रौत्सवाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन जय भवानी मित्र मंडळ बापेरे (मुंबई) वालमवाडी व महेश गुरव यांनी केले आहे.