सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची मतदार नोंदणी अभियान आढावा बैठक
सावंतवाडी । प्रतिनिधी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विकासाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाला प्रत्येक निवडणूकीत सातत्याने मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराला भाजपचा सदस्य म्हणून त्याची नोंदणी करून घ्या. ‘भाजपला मत म्हणजे विकासाला मत ‘ हे प्रत्येक मतदाराच्या मनात रुजवा. देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार व राज्यातील फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार त्यांच्या माध्यमातून सुरू असलेली विकास कामे घराघरापर्यंत व प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा व त्यांची भारतीय जनता पार्टी अधिकृत नोंदणी करून घ्या. हे अभियान १५ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून जिल्ह्याला दिलेले तीन लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करू त्यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उद्दिष्ट पूर्ण करा असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी केले.
सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची मतदार नोंदणी अभियान आढावा बैठक सावंतवाडी बॅरिस्टर नाथ पै सभागृहात खासदार नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्यांनी सावंतवाडी मतदारसंघाचा शहर व ग्रामीण भागातील सभासद नोंदणीचा जिल्हा परिषद मतदार संघनिहाय आढावा घेतला.
राष्ट्रीय पातळीवर अभिप्रेत सावंतवाडी मतदार संघाची नोंदणी होणे आवश्यक आहे.भाजपा कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन सभासद नोंदणी करावी शासनाच्या विविध योजना घरोघर जाऊन सांगून आपली सभासद संख्या वाढण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पदाधिकारी आजपासून सक्रिय होऊन या सभासद नोंदणी अभियानामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले
यावेळी कोकण विभागाचे मतदार नोंदणी अभियान प्रमुख श्री .जाधव यांनी मार्गदर्शन करताना कोकणला एक ऐतिहासिक वारसा आहे आज पूर्ण कोकण हे भाजपमय झालेला आहे त्यामुळे संपूर्ण राज्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नोंदणी मध्ये क्रमांक एक यावा या दृष्टीने प्रत्येक शक्ती केंद्रप्रमुख बुथ अध्यक्ष तसेच आजी माझी पदाधिकारी यांनी या नोंदणी मध्ये सक्रिय होऊन सहभाग घ्यावा, असे ते म्हणाले.
जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा पंचायत समिती निहाय आढावा घेऊन खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे तसेच माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे हात बळकट करूया तसेच जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी प्रत्येक पंचायत समिती मतदार संघ निहायमतदार नोंदणी करण्याचे उद्दिष्ट दिले. यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग घर चलो अभियान मतदार नोंदणी प्रमुख रणजीत देसाई, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,सरचिटणीस महेश सारंग, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर,मंडल अध्यक्ष रवींद्र मडगावकर, महेश धुरी, अजय गोंदावळे व मंडल अध्यक्ष उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तर आभार श्वेता कोरगावकर यांनी केले.यावेळी सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












