खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील घाणेखुंट गावची सुकन्या आणि चिपळूणच्या डिबीजे उच्च महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम वर्षात
शिकणाऱ्या अनुष्का रोकडे हिची एनसीसी, एनएसएस, क्रीडा, संस्कृतिक सर्व विभागांमध्ये उत्कृष्ट
कामगिरी केल्याने सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून निवड झाली असून, तिला कडवेकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या पुरस्काराबद्दल खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष अनुज जोशी, उत्तमकुमार जैन, प्रशांत पटवर्धन, सदानंद जंगम, हर्षल शिरोडकर, दिवाकर प्रभू, सुनील आंब्रे देवेंद्र जाधव आदींनी तिचे अभिनंदन केले.









