४३ कोटी रुपयांची राबवणार योजना, योजनेचे कामही हाती
खेड(प्रतिनिधी) शहरासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सततच्या पाठपुराव्याने प्रस्तावित नवीन नळपाणी योजनेस ४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. या नवीन नळपाणी योजनेचे काम देखील हाती घेण्यात आले आहे. यामुळे शहरवासियांना लवकरच मुबलक पाणी मिळणार आहे. वर्षानुवर्षे सतावणाऱ्या कमी दाबाच्या पाणी समस्येसह शहराला भेडसावणारा पाणीप्रश्न निकाली निघणार आहे.
वर्षानुवर्षे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरातील काही भागात कमी दाबाची पाणी समस्या पाचवीला पुजल्यासारखी आहे. काही भागात दिवसातून एकच वेळ नळाला येणाऱ्या पाण्यामुळे प्रसंगी नागरिकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.
शहरातील नागरिकांना भेडसावणारा पाणीप्रश्न कायमस्वरुपी संपुष्टात आणण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम हे आमदार असताना त्यांनी शिवसेना नेते रामदास कदम शहराला भेडसावणारी पाणीसमस्या यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन ३१ वर्षांपूर्वीच्या जुन्या नळपाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे योजनेतील जलवाहिनीमुळे निर्माण नवीन नळपाणी योजनेसाठी निधी झाली होती. यामुळे शहरवासियांना उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने
पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश येत शहरासाठी नवी नळपाणी योजनेसाठी ४३ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.
गृहराज्यमंत्री कदम यांनी चार दिवसांपूर्वी प्रस्तावित नळपाणी योजनेबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेत आराखड्याची पाहणी केली. यादरम्यान, कदम यांनी अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सूचना करत काही त्रुटीही निदर्शनास आणून देत तातडीने नव्या नळपाणी योजनेचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रत्यक्षात नव्या नळपाणी योजनेचे काम देखील सुरू झाल्याने लवकरच शहरवासियांना सतवणारा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.











