खेड लायन्स क्लब ऑफ सिटीतर्फे क्रिकेट स्पर्धा, लिओ क्लब विजेता
खेड(प्रतिनिधी) खेड लायन्स क्लब ऑफ सिटीतर्फे आयोजित लायन्स क्रीडा महोत्सव क्रिकेट स्पर्धेत खेड पंचायत समिती प्रशासकीय कर्मचारी संघाने व खुल्या गटात सुसेरीच्या टच ग्रुप संघाने विजेतेपद पटकावले. खेड लिओ क्लब व कुंभारवाडा आदर्श क्रिकेट संघाला उपविजेतेता ठरला.
विजेत्या संघांना रत्नाकर शिलेवंत यांच्या वडीलांच्या व लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ओंकार गोंदकर यांच्या आईच्या स्मरणार्थ चषक देवून गौरण्यात आले. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर यांनाही गौरवण्यात आले. खुल्या गटातील विजेत्यास भरणे येथील मोरे फर्निचरचे मालक संदीप मोरेंतर्फे ११,१११ रुपये, उपविजेत्यास करवा एंटरप्राईजेसचे सागर करवा यांच्यातर्फे ७,७७७ रुपये, तृतीय खोंडे संघास तळे-सई मेडिकलचे प्रफुल्ल मोरे यांच्यावतीने ३,३३३
रुपये व चषक देवून गौरवण्यात आले. पंच राकेश मोरे यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकणे, कार्यक्रमप्रमुख ओंकार गोंदकर, राजेश जोयसर, शैलेश धारिया, प्रथम उपप्रांतपाल वीरेंद्र चिखले, डॉ. विक्रांत पाटील, मिलिंद तलाठी, पंकज शहा, सचिव संतोष शिंदे, खजिनदार प्रवीण पवार, उपाध्यक्ष विनोद मोरे, माणिक लोहार, सहसचिव संदीप मोरे, विवेक कदम, हनिफ घनसार, विनोद देसाई, निनाद गांधी, उमेश चव्हाण, महेंद्र शिरगावकर, ओम जाधव, अनिल मोरे उपस्थित होते.









