केस गळती प्रकरण; रुग्णांची संख्या 51 वरून पोहचली 100 वर

बुलढाणा : जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात जवळपास ११ गावातील नागरिकांना केस गळती व्हायला लागली आहे. तर रुग्णाची संख्या 5 वरून आता 100 वर गेली आहे. दुसरीकडे पाण्याचा वापर आंघोळीसाठी करू नये असा आवाहन शासनाने केल्यानंतर मागील आठवडाभरापासून गोंडगाव येथील गावकऱ्यांनी आंघोळच केली नाही आहे. केस गळतीचे प्रकरण समोर आल्यापासून आरोग्य पथक गावात ठाण मांडून आहे. लागण असलेल्या रुग्णांचे स्किन आणि केसांचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

दरम्यान, त्वचा तज्ज्ञांच्या सूचनेनुसार या भागातील पाण्यातील लीड आणि आर्सेनिकच्या प्रमाणाच्या तपासणीसाठी त्याचे नमुने सुद्धा नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल येण्यास किमान आठ दिवस लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आरोग्य विभागाने बाधित गावातील नागरिकांची अॅन्टी फंगल क्लिनिकल तपासणी सुरू केली आहे. यापूर्वी काही गावातील पाण्याचे जैविक, रासायनिक नमुने तपासले असून त्यांचा अहवाल मिळाला आहे त्यात नायाट्रेटचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. बोंडगाव सह कालवड, कठोरा, भोनगाव, मच्छिंद्रखंड, हिंगणा वैजिनाथ, घुई, माटरगाव, पहरजिरा, निंबी, तरोडा कसबा या गावातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात केसगळती होऊन टक्कल पडत आहे.