स्व. राजनभाई आंगणे 16 वर्षे खालील प्रीमियर लीग : एम क्रिकेट अकॅडमी सावंतवाडी यांच्या वतीने मालवण बोर्डिंग मैदान येथे आयोजन
मालवण | प्रतिनिधी : एम क्रिकेट अकॅडमी, सावंतवाडी यांच्या वतीने मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे आयोजित स्वर्गीय राजनभाई आंगणे प्रीमियर लीग 16 वर्षे खालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
मनमिळावू स्वभावाचे प्रेमळ व्यक्तीमत्व असलेले स्व. राजन आंगणे यांनी नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन दिले. त्यांचे अचानक जाणे म्हणजे भरून न येणारी पोकळी आहे. त्यांच्या नावाने अश्या स्पर्धा सातत्याने आयोजित व्हाव्यात. राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक निर्माण करणारे खेळाडू यां पुढेही यां बोर्डिंग मैदानावर घडावेत. लागेल तें सहकार्य आपण देऊ. असे दत्ता सामंत यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी प्ले बॉईज संघाच्या माध्यमातून असलेल्या अनेक जुन्या आठवणीना उजाळा दिला. तसेच बोर्डिंग मैदानावर आयोजित अश्या स्पर्धातून अनेक खेळाडू घडतील. असे सांगत स्व. राजन आंगणे यांच्या स्मृतीना उजाळा दिला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख उद्योजक दत्ता सामंत, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, सिंधुदुर्ग जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष मंदार नार्वेकर, एम अकॅडमी अध्यक्ष उदय नाईक, राहुल रेगे, रघु धारणकर, बबन रेडकर, बबन रेडकर, जॉन नरोना, किसन मांजरेकर, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, सूर्यकांत फणसेकर, दादा नाईक, राजू बिडये, ऋषिकेश सामंत, दीपक धुरी, आंब्रोज अल्मेडा, सुशील शेडगे, संदीप भोजणे, सचिन सावंत यांसह अन्य पदाधिकारी, खेळाडू, कोच व पालक उपस्थित होते.
यावेळी दत्ता सामंत यांनी लेदर बॉल वर फलंदाजी करताना मोठी फटकेबाजी केली. सर्वच क्षेत्रात असलेली त्यांची छाप यां निमित्ताने उपस्थितांनी अनुभवली.
स्पर्धा 10 ते 15 जानेवारी व 25 ते 29 जानेवारी यां कालावधीत संपन्न होणार आहे. सिंधुदुर्ग व गोवा येथील 16 वर्षे खालील खेळाडू विविध 5 संघात सहभागी आहेत. अशी माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली.