वेंगुर्ले l प्रतिनिधी :दाभोली नागडेवाडी येथे शेतकऱ्यांच्या श्रमदानातून वनराई बंधरा बांधण्यात आला.
यावेळी काका सामंत सर, उमेश खानोलकर, संजय नागडे, सर्वेश खानोलकर, केतन खानोलकर, अँड. श्रीकृष्ण ओगले, कीशोर पेडणेकर , संदिप गोवेकर, संजय गोवेकर, नरेंद्र पेडणेकर गणेश आरावंदेकर, अजय नागडे, रामदास बादवलकर मा. तालुका कृषी अधिकारी, यांच्या श्रमदानातून बांधण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री मंगेश चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी श्री. प्रकाश मोहिते यांच्या हस्ते बंधरा पूर्ण झाल्यावर जलपूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक श्री. एस.बी.देसाई, श्री. एस.ए.नाईक, दाभोली गावाचे कृषि सहाय्यक श्री. जीवन परब, तसेच कृषि सहाय्यक लाडू जाधव, सचिन कुरंगल, ज्ञानेश्वर सोनटक्के, तसेच पर्यावरण मित्र अजित कुमार परब व गावातील शेतकरी मित्र उपस्थित होते सदर बंधा-या साठी ८००पिशव्या वापरून 21मी. लांबीचा बंधरा बांधण्यात आला. यामुळे 2 ते 2.5 किमी मधील बागायती शेतीला याचा एप्रिल पर्यंत उपयोग होणार आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरातील विहिरींची पाणीपातळी ही वाढण्यास सुरुवात झाली आहे.











