मानवता विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत : मालवण येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी
मालवण | प्रतिनिधी : धर्मावीर छत्रपती संभाजी राजे देशाचे आदर्श आहेत. संभाजी राजे यांचे कार्य, कर्तुत्व, युद्ध निती, बुध्दी अतिशय अफाट होती. संभाजी राजे यांचा इतिहास नव्या पिढीला सांगणे काळाची गरज आहे. संभाजी राजे खऱ्या अर्थाने धर्मवीर होते आणि ते मराठ्यांचे राजे होते हे आम्हा सर्वांसाठी भूषण आहे. असे प्रतिपादन मानवता विकास परिषद अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी मालवण भरड येथील लीलांजली सभागृहात बोलताना केले.
मालवण येथे धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्र मधील एक अग्रगण्य संस्था मानवता विकास परिषदच्या वतीने साजरी करण्यात आली. प्रथम छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला नायब तहसीलदार आनंद मालवणकर आणि श्रीकांत सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी धर्मवीर संभाजीराजे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या घोषणा उपस्थिततांमधून देण्यात आल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नामदेव मठकर, आनंद मालवणकर, मानवता विकास परिषदचे अध्यक्ष श्रीकांत सावंत, ज्येष्ठ वकील समीर गवाणकर, सामाजिक कार्यकर्ते मारुती सोनवडेकर, संतोष नागवेकर, बिळवस सरपंच मानसी पालव, आशिष खोत, दत्तप्रसाद पेडणेकर आणि मानवता विकास परिषदचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ज्येष्ठ वकील समीर गवाणकर यांनी छत्रपती संभाजी राजे यांचा इतिहास सभागृहात सादर करून मानवता विकास परिषदेच्या उपक्रमाबद्दल कौतुक केले.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना आनंद मालवणकर म्हणाले मानवता विकास परिषद च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मालवण मध्ये साजरी करताना संभाजी राजेंचा इतिहास खऱ्या अर्थाने आज जागवता आला यापुढेही आपण सर्वांनी संभाजी राजे यांच्या विचारांचे पालन करून मार्गक्रमण करणे जरुरीचे आहे असे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे मानवता विकास परिषद चे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सत्कार केला. यावेळी मालवण तालुका विकासात्मक बाबत चर्चा विनिमय करण्यात आली.












