दोन दुचाकींमध्ये समोरासमोर भीषण अपघात ; इन्सुली खामदेव नाक्यावरील घटना

 

दोघे दुचाकीस्वार जखमी

बांदा : प्रतिनिधी

इन्सुली खामदेव नाक्यावर दोन दुचाकींमध्ये समोरासमोर अपघात होऊन दोघे दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. सागर गुरव (२५, सध्या रा. इन्सुली) व सलीम बेग (रा. सावंतवाडी) अशी त्यांची नावे आहेत. सागर गुरव यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दोन्ही जखमींना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे.
बांदा पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हा अपघात आज सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला.