सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये राज्य क्रीडा दिन साजरा.

चिपळूण (प्रतिनिधी) :– तालुक्यातील परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडीअम स्कूलमध्ये दि .15 जानेवारी 2025 रोजी. कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस म्हणून राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला .

या कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मजा येसादे तसेच माध्यमिक विभागाच्या विभाग प्रमुख सौ.सविता कर्वे , क्रीडा शिक्षक आणि स्काऊट मास्टर श्री. प्रवीणकुमार आवळे यांनी कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने केली . प्रशालेच्या माध्यमिक विभागातील इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या अर्णव चव्हाण आणि भक्ती कोकरे या विद्यार्थ्यांनी आजचा दिवस राज्य क्रीडा दिन म्हणून कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांच्या नावाने का साजरा केला जातो ? याचे महत्त्व उत्तमरीत्या विशद केले.
त्यानंतर प्रशालेतील माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मजा येसादे यांनी जे विद्यार्थी राज्यस्तरावर खेळून आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना पुष्प देऊन सन्मानित केले.

 

या कार्यक्रमाचे औचित्य साधून इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची इंग्लिश मधून वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला परीक्षक म्हणून सौ. पूर्वा कदम यांना आमंत्रित करण्यात आले होते . या स्पर्धेला पाचवी ते नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये जे सहभागी विद्यार्थी उत्तम बोलले अशांचे क्रमांक परीक्षक सौ. पूर्वा कदम यांनी काढले.
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन प्रशालेचे क्रीडा शिक्षक आणि स्काऊट मास्टर श्री. प्रवीणकुमार आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी केले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार इयत्ता नववी ‘अ ‘मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कुमारी कृष्णाई महाडिक हिने मानले.
अशा प्रकारे हा कार्यक्रम प्रशालेचे सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या सहकार्याने उत्तमरीत्या पार पडला .