चिपळूण (वार्ताहर) : मार्गताम्हाने येथील नातू प्रतिष्ठानच्या इंग्लिश मिडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांचे रत्नागिरी जिल्हा हौशी ज्युदो संघटना, गुहागर आयोजित सब ज्युनिअर गट जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत यश मिळविले.
या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी कु. मितेश हिरालाल सुंदेशा ६६ कि. वजनीगटातून प्रथम क्रमांक, कु. साकीब साबिरअली अलवारे ६०कि. वजनीगट प्रथम क्रमांक, कु. सोहम महेश सुर्वे ४० कि. वजनीगट प्रथम क्रमांक मिळविला. आता यांची निवड सब ज्युनिअर गट राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे आणि ही स्पर्धा लातूर येथे घेण्यात येणार आहेत. या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्याकरिता शाळेचे प्रशासक श्री. प्रमोद प्रभुणे, मुख्याध्यापिका सौ. कृत्तिका सोहनी व ज्युदो प्रशिक्षिका सोनाली वरंडे उपस्थित होत्या. त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व पुढल्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संस्थेच्या व प्रशालेच्या वतीने या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.













