चिपळूण (प्रतिनिधी) : गुजरात येथे ११ जानेवारी रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२५ मध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करत चिपळूण येथील डायडाज द इंटरनॅशनल डान्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सलग दहाव्यांदा सुवर्ण पदकांची कामगिरी करत शाळेचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले. या स्पर्धेत ३६० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते आणि विविध राज्यांतील सहभागामुळे स्पर्धा अत्यंत प्रतिष्ठेची होती.
विद्यार्थ्यांचे वैयक्तिक यश: ६-८ वयोगट: हिप हॉप प्रकारात: आधिर अभिजित लाड – सुवर्ण पदक फ्रीस्टाईल प्रकारात: पूर्वा ऋशांत जाधव – सुवर्ण पदक ८-१० वयोगट: डुएट फ्रीस्टाईल प्रकारात: अनय सुनील सुतार व निहीरा निखिल माळी- सुवर्ण पदक १४ वर्षाखालील गट: फ्रीस्टाईल ह्याप्रकरात. काव्या दीपक चव्हाण, आराध्या दीपक चव्हाण, पूर्वा ऋशांत जाधव, भक्ती ऋशांत जाधव- सुवर्ण पदक
मार्गदर्शन व आयोजकांचे कौतुक:
या उल्लेखनीय कामगिरीसाठी विद्यार्थ्यांना डायडाज द इंटरनॅशनल डान्स स्कूलचे प्रशिक्षक सवरांजली निमकर व शाळेचे संस्थापक व संचालकसुरज विलास जाधव यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. श्री. जाधव हे भारतीय संघाचे मॅनेजर व महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या समारोप समारंभात सुवर्ण पदके प्रदान करत आयोजक डान्स स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव श्री. रजनीकांत ठाकूर व प्रसिद्ध डान्स मास्टर व ऑस्कर पुरस्कार विजेते तसेच डान्स स्पोर्ट्सचे ब्रँड ॲम्बेसेडर कमलेश पटेल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी या सर्व विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित केले.
डायडाज शाळेची ओळख:
सलग दहावेळा सुवर्णपदक मिळवत डायडाज द इंटरनॅशनल डान्स स्कूलने राष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाळेच्या अचूक व प्रभावी प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळाला असून हे विद्यार्थी आता भारताचे प्रतिनिधित्व करीत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत. शाळेचे संचालक सुरज विलास जाधव यांच्या मते, “विद्यार्थ्यांच्या यशामध्ये सातत्यपूर्ण मेहनत, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन यांचा वाटा आहे. त्यांचे यश ही संपूर्ण शाळेच्या कुटुंबाची मिळकत आहे.










