कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली), सावर्डेच्या माजी विद्यार्थ्यांचा १८ जानेवारी रोजी महामेळावा संपन्न

चिपळूण :–कॉलेजच्या आठवणीने उजाळा देत कॉलेज ऑफ फार्मसी (पॉली), सावर्डे या महाविद्यालयात 1984 पासून माजी विद्यार्थी १८ जानेवारी २०२५ रोजी Alumini Meet २०२५ हा पुनर्मिलन महामेळावा उत्साहात पार पडला. मेळाव्याच्या निमित्ताने परत एकदा तब्बल एकोणचाळीस वर्षातील एकत्र आलेले सर्व माजी विद्यार्थी आठवणीत हरवून गेले होते.वर्ग मित्र भेटल्याचा आनंद सर्वाच्या चेहर्‍यावर दिसत होता.

महाविद्यालयाच्या चेअरमन सौ.पूजाताई शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी व MSCDA चे खजिनदार आणि AIOCD चे सहसचिव मा.श्री. वैजनाथ जागुष्टे श्री मिलिंद लांडगे, श्री गजानन मोहिते ,सह्याद्री शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी श्री महेश महाडिक सर, तसेच संचालक श्री मारुती घाग, श्री अनिरुद्ध निकम ओलीवर मर्चंट,प्रकाश राजेशिर्के ,डॉ वैशाली पाटील मॅडम, श्री विश्वनाथ मस्के सर आदींची उपस्थिती होती
प्रारंभी शिक्षण महर्षी स्व गोविंदराव निकम साहेब यांच्या प्रतिमेला पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गुरूपेक्षा शिष्य मोठ्या पदावर गेला तर गुरुचेज्ञानाची मोठेपणा असते असे मत प्रा.रुची भुरण मॅडम यांनी व्यक्त केले. प्राचार्य देसाई सर यानी ओघवत्या शैलीत जुन्या आठवणींना उजाळा दिला
महाविद्यालयाचे हे विद्यार्थी केवळ बाहेर पडलेले नसून ते स्थिर भविष्यासाठी ज्ञानाची परिपूर्ण शिदोरी घेऊन कर्तुत्व संपन्न होण्यासाठी बाहेर पडलेले माजी विद्यार्थी आहेत
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य देसाई सर व देशपांडे सर यांनी केले.सूत्रसंचालन भुरण मॅडम यांनी तर उपस्थितांचे आभार जाधव मॅडम यांनी मानले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मेहनत घेतली