ज्ञानदीपच्या नील महाडिकची राज्य बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

खेड (प्रतिनिधी) जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग स्पर्धेत भडगाव येथील कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिरमधील इ. १०वीतील नील सुनील महाडिक याने जिल्हास्तर बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याची राज्यस्तर बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
त्याला क्रीडाशिक्षक संतोष भोसले, रवींद्र देवळेकर, चेतना धारिया यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष अरविंद तोडकरी यांच्याहस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लढ्ढा, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे, प्राचार्य राजकुमार मगदूम, मुख्याध्यापिका पूर्वा मोरे आदी उपस्थित होते.