पालकरवाडी उपसरपंचपदी भाजपच्या नंदिता शेर्लेकर यांची बिनविरोध निवड

वेंगुर्ले | दाजी नाईक : पालकरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या नंदिता नारायण शेर्लेकर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.पालकरवाडी सरपंच सदाशिव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव (ग्रामपंचायत अधिकारी) व्ही.जी.सावंत यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सभागृहात झालेल्या सभेत ही बिनविरोध निवड प्रक्रिया पार पडली.

माजी उपसरपंच यशवंत कापडी यांनी 19 डिसेंबर रोजी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी नंदिता शेर्लेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उमा करंगुटकर ,संगीता परब , शुभदा गोसावी ,दर्शना पालकर ,विकास अणसूरकर , दिपक मोहिते , यशवंत कापडी , दिनकर पालव. तसेच ग्रामस्थ सूर्याजी नाईक, नारायण शेर्लेकर , महेश कोंडसकर , दिपक करंगुटकर ,सुरेश गावडे , गोविंद गावडे , दिपक करंगुटकर ,आनंद गावडे ,बाळा शेर्लेकर , वसंत शेर्लेकर आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.