माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. अस्मिता केंद्रे यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना नेते रामदास कदम आमदार योगेश कदम अस्मिता केंद्रे यांचे स्वागत करताना

मंडणगड | प्रतिनिधी : माजी जिल्हा परिषद सदस्या व काँग्रेस आय पक्षाच्या सक्रीय कार्यकर्त्या सौ. अस्मिता केंद्रे यांनी 13 मे 2023 रोजी जामगे येथे शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्या माजी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रमुख सौ. अस्मिता केंद्रे यांनी आपल्या शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांची भेट घेतली. शिवसेना नेते रामदास कदम व आ.योगेश कदम यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी केंद्रे म्हणाल्या, आम्ही आघाडी म्हणून गेल्या काही वर्षापासून मंडणगड मध्ये काम करत होतो. परंतु आघाडी केवळ नावालाच होती. प्रत्येक निवडणुकीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पाडापाडी च्या राजकारणाचा सामना करावा लागत होता.

आमदार योगेश कदम यांच्यारूपाने दापोली मतदारसंघाला तरुण, तडफदार व विकासाचे राजकारण करणारे नेतृत्व लाभल्याने आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळू लागली असून आशेचा किरण निर्माण झाला आहे. मी विकासाच्या भूमिकेतून शिवसेनेत प्रवेश करत आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या नेतृत्वावर आम्हाला पूर्ण विश्वास असून संघटना जी जबाबदारी देईल ती प्रामाणिक पणे पूर्णत्वास नेऊ तसेच मंडणगड तालुक्यातील शिवसेना आणखी बळकट करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपजिल्हा प्रमुख सुधीर कालेकर, शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, दापोलीचे तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, अनंत केंद्रे, विभाग प्रमुख संजय शेडगे, अनंत केंद्रे, उप तालुकाप्रमुख हरिश्चंद्र कोदेरे, महिला तालुका संघटक अमिता शिंदे, इरफान बुरोंडकर, बदृद्दिन उंडरे आदी उपस्थित होते.