भोम यशवंत शिक्षण संस्था भव्य तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

दिग्गज क्रीडा रसिकांची लागली हजेरी

चिपळूण (प्रतिनिधी) : भोम येथे यशवंत शिक्षण संस्थेच्या वतीने नुकत्याच तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा पार पडल्या. चिपळूण तालुका भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केल्याने या स्पर्धेच्या माध्यमातून राष्ट्रीय व जागतिक स्तरावरील अनेक क्रीडापटू घडावेत. ग्रामीण व दूर्गम भागात स्पर्धकानी तसेच क्रीडा रसिकांनी या स्पर्धेत चांगला सहभाग घेतला आहे, असे मार्गदर्शनपर सुतोवाच अध्यक्ष शांताराम आदवडे यांनी केले.

मुख्याध्यापक तानाजी कांबळे यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयाच्या वाटचालीचा आढावा घेतला सांगितले. तर चिपळूण तालुक्यातून सर्व खेळाडूना एकत्र येऊन एक दौड आरोग्यासाठी, एक दौड देशासाठी घडावी. त्याचबरोबर जागतिक स्तरावरील स्पर्धेचे मार्गदर्शन व्हावे. परिसरातून उत्तम खेळाडू घडावेत या उद्देशाने संस्थेच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. चिपळूण तालुक्यातून मोठ्या संख्येने स्पर्धक व माजी विद्यार्थी, स्वयंसेवक सहभागी झाल्याबद्दल त्यांचे कौतुक मुख्यकार्यकारी अधिकारी संजय शिर्के यांनी केले आहे.

या कार्यक्रम प्रसंगी पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक माजी निवृत्त अधिकारी चंद्रकांत कदम, माजी सैनिक सखाराम चव्हाण, व्यावसायिक सचिन कदम, तुषार कदम ज्ञान प्रबोधिनी पुणे, संदेश कातकर ओम मोटर ड्रायविंग प्रशिक्षण केंद्र, भोम चिपळूण, या मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन संस्था अध्यक्ष, पदाधिकारी, माजी विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आला.

चिपळूण तालुका भव्य मॅरेथॉन स्पर्धा २०२५ या स्पर्धेत गट क्रमांक १ मध्ये १४ वर्षाखालील मुले प्रथम क्रमांक वीर मेटकर, द्वितीय क्रमांक अथर्व दवंडे, तृतीय क्रमांक सार्थक कदम मुलींमध्ये प्रथम, प्रियन्शी शितप द्वितीय रिद्धी भालेकर तृतीय क्रमांक निधी शिगवण पटकाविला. गट क्रमांक २- १७ वर्षाखालील मुले प्रथम राठोड, द्वितीय मंथन खेराडे तर तृतीय क्रमांक विराज निवाते यांनी पटकावला.

मुलींमध्ये प्रथम हुमेश सय्यद, द्वितीय अनुष्का खेराडे, तृतीय क्रमांक रिया भोने हिने पटकाविला. गट क्रमांक ३- पुरुष खुला गट प्रथम क्रमांक स्वराज जोशी द्वितीय क्रमांक ओमकार चांदिवडे, तृतीय क्रमाक आर्यन नाके खुला गट स्त्री प्रथम क्रमांक दीक्षा तांदळे, द्वितीय क्रमांक रविना भागडे तृतीय क्रमांक दिव्या तांदळे हिने पटकाविला.

या कार्यक्रमात विजेत्या प्रथम तीन स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते गोल्ड, सिलव्हर, ब्रांझ पदक, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविले गेले. या स्पर्धेत तालुक्यातील शाळा, क्रीडा क्लब, मंडळ, तसेच विद्यार्थी, क्रीडा रसिक यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.

चिपळूश्री तालुका भव्य मॅरेथॉन प्रतीक २०२५ साठी संस्था अध्यक्ष रामजी आदवडे, प्रकाश शिर्के, मुख्यकार्यकारी अधिकारी संजय शिर्के, संचालक महेश सुर्वे, सचिन पैसा, यशवंत गोरीवले, संचालिका डॉ. सौ. सुमिता शिर्के, सचिव प्रशांत शिर्के, भोम पंचक्रोशीतील सरपंच, पोलिस पाटील, गाव तंटामुक्ती अध्यक्ष, प्रतिष्ठित व्यापारी, परांजपे हायस्कूल मुख्याध्यापक भाऊ काबळे, चिवेली मुख्याध्यापक संजय चव्हाण, माजी विद्यार्थी लवू नरळकर, सचिन कदम, नंदू चव्हाण, नितीन निकम, लवू व अंकुश मोरे, नंदू कदम, विकास उदेग, नितीन गुरव, रूपेश कदम तसेच असंख्य व्यापारी, नागरिक, परिसरातील हायस्कूल क्रीडा शिक्षक, रसिक आदी याची उपस्थिती लाभली.

चिपळूण तालुकास्तरीय मिनी मॅरेथॉन स्पर्ध २०२५ च्या यशस्वीतेसाठी शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. आशीर्वाद थत्ते, शिक्षक संघटनेचे नेते बळीराम मोरे, नगर पालिका प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, युवा नेतृत्व श्री कपिल शिर्के, लहू नरळकर, सचिन कदम, विलास वाजे, नितीन गुरव मुख्याध्यापक, शिक्षक यांनी स्पर्धापूर्व नियोजन केले.

या माजी विद्यार्थी नियोजन मिटिंगसाठी मुख्याध्यापक तानाजी कांबळे व शिक्षक गणेश सोनवणे यांनी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे सभा घेतली. महादेवराव शिर्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, भोम व माध्यमिक विद्यालय, दोणवली मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी विद्यार्थी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलेत.

क्रीडा शिक्षक मुकुंद पोटभरे यांनी गट निहाय संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले तर क्रीडा शिक्षक स्वप्नील आम्बेडे यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दोणवली हायस्कूलचे मुख्याध्यापक धनाजी देसाई यांनी केले. इयत्ता ५ वी ते १२ वी च्या मुलांनी सहाय्य केले.